15 हजार एलईडी पथदिव्यांनी शहर उजळणार!

0

आ. राजुमामा भोळे व महापौर सिमा भोळे यांच्याहस्ते
उद्घाटन : पथदिवे बसविण्यास सुरुवात
जळगाव दि. 29-
शहरात 1309 एलईडी पथदिवे लावण्यास दि. 29 रोजी शुभारंभ झाला. कामाचा शुभारंभ आ. राजुमामा भोळे व महापौर सिमा भोळे यांच्याहस्ते नेहरु चौकात उद्घाटनाने झाला.
यावेळी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांचेसह स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, महिला व बालकल्याण समिती सभापती मंगला चौधरी, गटनेते भगत बालाणी, सदस्य सदाशिव ढेकळे, नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे,रियाज बागवान, प्रशांत नाईक, राजेंद्र पाटील, स्वीकृत सदस्य कैलास सोनवणे, महेश पाटील, राजेंद्र मराठे, ज्योती चव्हाण, उज्वला बेंडाळे, सरिता नेरकर, गायत्री राणे, प्रतिभा पाटील, सुरेखा तायडे शिवसेनेचे महानगराध्यक्ष शरद तायडे,सामाजिक कार्यकर्ते आबा कापसे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, विद्युत विभाग प्रमुख एस. एस. पाटील आदी उपस्थित होते. 743 कि.वॅ. विजेची बचत
शहरात आज पथदिव्यांच्या संख्येनुसार 1311 किलो वॅटचा लोड येत आहे. एलईडी बसविल्यानंतर केवळ 567 किलो वॅटचा लोड येणार आहे. त्यायोगाने 743 किलो वॅटची बचत होणार आहे.
वर्षाला 1 कोटी 95 लाखाची बचत
आज एक वर्षाचा वीज खर्च 3.44 कोटी एवढा आहे. एलइडी बसविल्यानंतर वीज बील 1.48 कोटी इतका खर्च येणार आहे. त्यायोगे मनपाचे 1.95 कोटी वीजबील वाचणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.