13 वर्षीय दिव्यांग मुलीवर बलात्कार; महिलेला अटक… गोड बोलून मित्रासोबत पाठवायची…

0

 

इंदापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

इंदापूर तालुक्यातील सहावीत शिकणाऱ्या 13 वर्षीय दिव्यांग आणि भोळसर मुलीवर वारंवार बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, मुलगी गरोदर राहिल्यामुळे हे प्रकरण बाहेर आले आहे. वालचंदनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी महिला शुभांगी अमोल कुचेकर हिला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

मागील आठवड्यात पिडीत मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला बारामतीत तपासणीसाठी नेल्यानंतर ही मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आले. त्यानंतर मुलीने सर्व घडला प्रकार सांगितला मुलीच्या आईने वालचंदनगर पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. नोव्हेंबर 2021 ते एप्रिल 2022 या कालावधीत वारंवार हा बलात्कार करण्यात आला. शुभांगी कुचेकर ही महिला सहावीत शिकणाऱ्या या मुलीला गोड बोलून फिरायला न्यायची आणि गाडीतून आलेल्या अनिल नलावडे बरोबर उसाच्या शेतात पाठवायची असा हा प्रकार घडला.

या प्रकरणातील आरोपी अनिल नलावडे आणि नाना बगाडे या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल नलावडे याने वारंवार या मुलीवर बलात्कार केल्याची फिर्याद या मुलीच्या आईने दिल्यानंतर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.