Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»चाळीसगावातील १३ नगरसेवकांचा मतदानावर बहिष्कार
    राजकारण

    चाळीसगावातील १३ नगरसेवकांचा मतदानावर बहिष्कार

    विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठी घडामोड
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 18, 2026No Comments915 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीत चाळीसगाव नगर परिषदेतील लोकनेते अनिल देशमुख यांच्या शहर विकास आघाडीचे ११ नगरसेवक तसेच दोन अपक्ष नगरसेवक अशा एकूण १३ नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

    चाळीसगाव येथे दुपारी २ वाजता स्वर्गीय माजी आमदार राजीव देशमुख यांच्या राजगड येथील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी व दोन अपक्ष नगरसेवकांनी जळगाव येथे होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला.

    यावेळी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना अपक्ष नगरसेविका सौ. सायली जाधव यांचे पती रोशन जाधव यांनी सांगितले की, “भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मतदारांकडे साधे मत मागण्यासाठीही आलेला नाही. अशा उमेदवाराला आम्ही मत कसे द्यावे, हा प्रश्न आमच्यासमोर आहे.” ते पुढे म्हणाले की, “निवडणुकीत उभे असलेल्या अपक्ष उमेदवारांनी एकामागून एक भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे लोकशाहीची थट्टा होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. याच कारणामुळे आम्ही या निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.”

    चाळीसगाव शहर विकास आघाडीचे गटनेते दीपक पाटील, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, ज्येष्ठ अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी तसेच रोशन जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला. यावेळी चाळीसगाव नगर परिषदेतील लोकनेते अनिल देशमुख, शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक तसेच दोन अपक्ष नगरसेवक उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif