ग्रामस्थांकडून यात्रेची जय्यत तयारी ; बोकड बळीची प्रथा बंद करून देवीला मिष्ठान्नाचा नैवद्य
पाचोरा प्रतिनिधी
सामनेर ता.पाचोरा ता 11 येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रंभाई मातेचा यात्रोत्सव दि 13 पासून सुरू होत आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यात्रेनिमित्त मोठया संख्येने भाविक नवस फेडण्यासाठी येत असल्याने ग्रामस्थांनी यात्रेची जय्यत तयारी केली आहे
रंभाई या सामनेर येथील चव्हाण कुळातील सून होत्या.त्यांचे माहेर हे नांदखुर्द ता एरंडोल येथील होते.त्या पवार घरण्यातील कन्या होत्या.ज्या दाम्पत्याला संतती होत नसेल एखाद्याचा दुर्धर आजार उपचार करूनही बरा होत नसेल तर लोक रंभाई देवीची भक्ती करायचे.ज्यामुळे संतती होत नसेल तर रंभाई देवीची भाविक भक्ती करायचे. ज्यामुळे संतती प्राप्त होऊन दुर्धर आजार ही बरे व्हायचे.देवीचा हास महिमा सर्वदूर पसरल्यानंतर येथे दर्शनासाठी गर्दी होऊ लागली व त्यातूनच या यात्रोत्सवाचे कोजागिरी पौर्णिमेला आयोजन होऊ लागले.
काही वर्षांपासून रंभाई देवीला यात्रोत्सवाच्या निमित्ताने बोकळ बळीची प्रथा सुरू होती. मात्र ग्रामस्थांनी बोकड बळी ऐवजी मिष्टान्न नैवद्य देवीला अर्पण करण्याचा निर्णय घेतला गेला.तेव्हा पासून पूर्णपणे बोकळ बळीची प्रथा बंद करण्यात आली. चव्हाण परिवारात परंपरागत पद्धतीने भाऊबंधकीतील एक एक याप्रमाणे यात्रोत्सव साजरा केला जातो. यावर्षी चे यात्रोत्सवाचे मानकरी रामकृष्ण चव्हाण, हिलाल चव्हाण, प्रदीप चव्हाण हे आहेत.
यात्रेनिमित्त आदल्या दिवशी गावातील ग्रामस्थ दरवर्षी नाटक बसवत असत काही दिवसांपासून कीर्तन होत जाते यावर्षी प्रभोधनात्मक व्याखानाचे आयोजन केले असून प्रमुख वक्ते म्हणून दर्शनाताई पवार यांचे व्याख्यान दि. 13 रोजी रात्री 8 वाजता आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या वैशाली आर. पाटील व सुचिता बी. पाटील ह्या असणार आहेत
यात्रेनिमित्ताने दि. 13 रोजी रात्री लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार असून दुपारी तगतरावची मिरवणूक काढुन तमाशा कलावंतांतर्फे ग्रामस्थाचे मनोरंजन केले जाणार आहे. यात्रेत विविध खाद्यपदार्थ, खेळणी , पाळणे, संसारोपयोगी साहित्य आदी दुकाने थाटली आहेत. यात्रोत्सवाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन चव्हाण परिवार व ग्रामस्थांनी केले आहे.