मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु असून १५ मेपर्यंत निकाल जाहीर होणार असल्याचं सांगण्यात आलंय. यासाठी उत्तरपत्रिकांच्या तपासणीचं काम वेगानं सुरू आहे. मात्र १२ वीच्या उत्तरपत्रिका जळाल्याची घटना समोर आलीय. यामुळे विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरारमध्ये बारावीच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. शिक्षकाने उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी नेल्या होत्या. त्यावेळी घराला आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत बारावीच्या उत्तरपत्रिकासुद्धा जळून खाक झाल्यानं खळबळ उडाली आहे. विरार पश्चिमेला असलेल्या बोलिंज नानाभाट रोड इथल्या गंगुबाई अपार्टमेंटमध्ये १० मार्च रोजी आगीची घटना घडली. शिक्षिकेनं उत्तपत्रिका तपासायला घरी नेल्या होत्या. पण समोवारी अचानक घराला आग लागली. या आगीत उत्तर पत्रिकांसा पूर्ण गठ्ठाच जळून खाक झालाय. या घटनेमुळे आता विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होणार आहे.
बोर्डाच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका या शाळेतच तपासणं बंधनकारक आहे. असं असताना शिक्षिकेनं उत्तरपत्रिका घरी का आणि कशा नेल्या असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिक्षण मंडाळ्या नियमानुसार उत्तरपत्रिका सुरक्षित आणि गोपनीय पद्धतीने शाळेतच तपासायच्या असतात. शिक्षिकेनं उत्तरपत्रिका घरी का नेल्या आणि त्यावर कारवाई होणार का याकडे आता लक्ष लागले आहे.


