Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»आगे मोहळच्या हल्ल्यात १२ शेतमजुर जखमी
    अपघात

    आगे मोहळच्या हल्ल्यात १२ शेतमजुर जखमी

    शेतमजुर प्रचंड भयभीत : मात्र जीवित हानी नाही
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 13, 2026Updated:April 13, 2026No Comments371 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    || लोकशाही न्यूज नेटवर्क ||

    पाचोरा तालुक्यातील वाणेगाव शेतशिवारात आगे मोहळच्या हल्ल्यात १२ शेतमजुर जखमी झाल्याची घटना १२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. जखमींना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत कुठलीही जीवीतहानी झाली नसली तरी शेतमजुर प्रचंड भितीच्या वातावरणात होते.

    पाचोरा तालुक्यातील वाणेगाव येथील अरुण (भोला) आप्पा पाटील यांच्या शेतात १२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास ज्वारी कापणीसाठी शेतमजुर गेले होते. दरम्यान शेताच्या बांधावर असलेल्या झाडावरील फांदीवर मोकाट वानराने उडी मारताच झाडाची फांदी तुटली व त्याच फांदीवर मधमाशांचे पोळ होत. फांदी तुटताच मधमाशांनी नजीकच असलेल्या शेतमजुरांवर हल्ला चढविला.

    यात अनुसयाबाई ताराचंद राठोड (वय – ६०), गोपाल शामा राठोड (वय – १७), अर्जुन मोतीलाल चव्हाण (वय – १८), रेखाबाई शाम राठोड (वय – ३५), ईश्वर जगन राठोड (वय – ३२), रेणुका कैलास राठोड (वय – ३४), संगिता जयराम चव्हाण (वय – ४५), रेखाबाई युवराज पवार (वय – ५५), करण मोतीराम चव्हाण (वय – १९), दिपक विष्णु राठोड (वय – २०), रेवाबाई मोतीराम चव्हाण (वय – ३०), भोला लाला राठोड (वय – २१) हे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मनिष देवरे यांनी जखमींना पिक अप मधुन पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

    वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी तातडीने जखमींवर उपचार सुरू केले. त्यांना परिचारिका दर्शना धनगर, पुनम वावरे, १०८ रुग्णवाहिका पायलट मनोज पाटील, शिपाई दिपक मोरे यांनी सहकार्य केले. जखमींना इन्जेक्शन व आय. व्ही. तातडीने देण्यात आली. दुपारनंतर सर्व जखमींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif