भुसावळात तब्बल 39 वर्षाने आजी नंतर नातवाची सभा
भुसावळ-
अवघ्या महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोर पकडू लागली आहे . शहर तालुक्यांमध्ये वरिष्ठ नेत्यांच्या सभा या गाजू लागल्या आहेत , तर काही ठिकाणी नियोजन व आराखडे तयार होऊ लागले आहे . जिल्ह्यातील वाढत्या तापमाना बरोबरच आता राजकीय तापमान सुद्धा वाढत आहे . विजय आपलाच व्हावा याकरिता राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्ये कामाला लागले आहेत . याच अनुषंघाने रावेर मतदार संघातील काँग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेस व पीआरपी महाआघाडीचे उमेदवार डॉ उल्हास पाटील यांच्या प्रचारा करिता भुसावळ येथे काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा स्व इंदिरा गांधी यांचे नातू राहुल गांधी येत आहे .1980 साली दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी भुसावळ शहरात सभा घेतली होती.तर आता 12 एप्रिल रोजी त्यांचे नातू राहुल गांधी यांची सभा होणार असुन या सभेकडे ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे .
रावेर लोकसभा मतदार संघाचे कॉग्रेस राष्ट्रवादी व काँग्रेस पीआरपी महाआघाडीचे उमेदवार डॉ उल्हास पाटील यांच्या उपस्थितीत भुसावळ शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानावर दिनांक 12 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजेला काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती येथील काँग्रेसचे माजी आमदार निळकंठ फालक यांनी पत्रकारपरिषदेत दिली . माजी आमदार नीलकंठ फालक यांच्या निवासस्थानी बुधवार दिनांक 3 मार्च रोजी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष मुन्नवर खान , शहर अध्यक्ष रवींद्र निकम , महिला कांग्रेस कमिटी च्या डॉ सुवर्णा गाढेंकर यांच्यासह कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते , आता 12 एप्रिल रोजी काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांची सभा होणार असुन या सभेकडे ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. रावेर मतदार संघातील तसेच भुसावळ येथील कार्यकर्ते राहुल गांधीं यांच्या जंगी स्वागताच्या तयारीला लागले असल्याचेही माजी आमदार निळकंठ फालक यांनी सांगितले . या ऐतिहासिक सभेस नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन क्रॉग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हाअध्यक्ष मुन्वर खान यांच्यासह पदाधिकारी यांनी केले आहे . .