नवी दिल्ली : 12वीच्या प्रॅक्टिकल परीक्षेच्या तारखा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एज्यूकेशन (CBSE) ने जाहीर केल्या आहेत. सीबीएसईने जारी केलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 8 फेब्रुवारीदरम्यान 12वी 2021 च्या प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात येणार आहेत. दरम्यान, सीबीएसईच्या वतीने या तारखा संभाव्य असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच बोर्डाच्या वतीने निश्चित तारखांसंदर्भातील सूचना लवकरच अधिकृत वेबसाइटवर जारी केल्या जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तारखांसोबतच परीक्षांची नियमावलीही जारी केली आहे.