विसापूर येथे दहावा टोल रोड वर्धापन दिन

0

 

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

बल्लारपूर तालुक्यातील वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर टोल रोड विसापूर व नंदोरी चा दहावा वर्धापन दिन विसापूर गावालगत टोलनाक्यावर एका सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रस्त्या सुरक्षा सप्ताह पण आयोजन करण्यात आले असता सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर क्र. १ चे अनिल गाडेगोने, अक्षय पगारे, तिवारी, नंदेश्वर यांचा प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.

सदर कार्यक्रम उपप्रादेशिक परिवहन विभाग चंद्रपूर किरण मोरे, चेतन गहुकर, किरण मुन अधिकारीसह वाहतूक शाखा चंद्रपूर पोलिस निरीक्षक प्रविण पाटील, बल्लारपूर पोलिस स्टेशन चे निरीक्षक सुनिल गाडे, शादाब पठाण, चंद्रपूर शहर पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरकुरे, तर पोलिस स्टेशन चंद्रपूर चे निरीक्षक आसिफ शेख ग्रामीण रुग्णालयात बल्लारपूर डाॅ. कोमल चांदेकर, वन स्टेप साॅलेशन प्रमुख डाॅ. विद्या धोबे यांचा मार्गदर्शनात पार पडला.

यावेळी विसापूर टोल व्यथापक दिलीप कंचलावार आपल्या आयोजित भाषणातून वर्धापन दिनी मागील गेल्या किती वर्षांत तरी रस्ता सुरक्षा सप्ताह आरोग्य तपासनी, नेत्र तपासणी, सोबत निशुल्क चष्मे वाटपाचे सुध्दा शिबिर घेत असतो, नागरिकांनी नेत्र तसेच आरोग्य तपासनी चा लाभ घेऊन आशिर्वाद रुपी समाधानकारक मिळाले तसेच क्रिकेट व मॅरेथॉन स्पर्धा पण घेतल्या जेणेकरून जागृतावस्थेत सर्व कार्यक्रम पार पाडले असे त्यांनी प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाचा यशस्वी करिता सहकारी म्हणून प्रविण चौरे, अमन यादव, नारायण चरपे, सचिन नागपुरे, जयपाल मरपे, अमित बगडे, खुशाल देठे, प्रकाष गजपुरे, नरेश नमिल्ला, नितेश राऊत, मुरली राय, हितेश धुर्वे, सुधीर मुत्त्येलवार, प्रेमसिंग शाक्या, रोशन पेटकर, आकाश शेडमाके, मयूर चौधरी, सचिन पिदूरकर, राहुल लटपटे, दिनेश ठक्कर, अंकेश मेश्राम, संगीता, यादव, रंजू भिसे, सुष्मा दुर्गे, विद्या गेडाम, प्राजक्ता भसारकर यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.