Monday, August 15, 2022

माऊली फाऊंडेशन भडगाव यांच्या वतीने पाणपोईचे उदघाटन

- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

भडगाव; माऊली फाऊंडेशन भडगाव यांच्या वतीने पारोळा रोड,शासकीय विश्राम गृहा समोर,भडगाव येथे पाणपोईचे उदघाटन करण्यात आले.माऊली फाऊंडेशनच्या वतीने सलग सहाव्या  वर्षी पाणपोई सुरु करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

आज पार पडलेल्या छोटे खानी कार्यक्रमात माऊली फाऊंडेशनचे उपाध्यक्ष आबासाहेब युवराज सुर्यवंशी यांनी नारळ वाढवून तर माऊली फाऊंडेशनच्या स्वयंसेविका संगिता जाधव यांनी फित कापुन पाणपोईचे उदघाटन केले .

याप्रसंगी वैशाली शिंदे मनिषा पाटील,वैशाली पाटील मीरा जाधव,देवेंद्र पाटील,प्रविण पाटील,रविंद्र कुलकर्णी,सुरेश रोकडे प्रा.सुरेश कोळी,दिलीप महाजन,संजय सोनार कळवाडी कर,कृष्णा पाटील, उन्नती पाटील आदी उपस्थित होते.याबाबतीत अधिक माहिती देतांना माऊली फाऊंडेशनचे उपाध्यक्ष युवराज सुर्यवंशी यांनी सांगितले की पाणपोई हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या