10 वी पास उमेदवारांसाठी आरबीआयमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी ; 26 हजार रुपयांपर्यंत मिळणार पगार

0

जर तुम्ही दहावी पास असाल आणि बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर अशा तरुणांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आरबीआयमध्ये ऑफिस अटेंडेटच्या 841 पदांसांठी भरती करण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज 15 मार्चपर्यंत अर्ज येणार आहेत. 10 वी उत्तीर्ण असणाऱ्यांना या पदासाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप अर्ज केला नसेल त्यांनी अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

10 वीच्या आधारावर निवड

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील ऑफिस अटेंडेंट पदासाठी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च आहे. या पदासाठीची पात्रता फक्त 10 वी उत्तीर्ण आहे. त्यामुळे दहावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.

अर्ज कसा करणार?

सर्वप्रथम opportunities.rbi.org.in या वेबसाईटला भेट द्या.

होम पेज वरील ‘Recruitment for the post of Office Attendants – 2020’ या लिंक वर क्लिक करा\

भरती प्रक्रियेचे नोटिफिकेशन वाचून Apply Online लिंक वर क्लिक करा

रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल आईडी चा वापर करा

रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या मदतीनं लॉगीन करा

लॉगीन करुन अ‌ॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करा

डाऊनलोड केलेला अ‌ॅप्लिकेशन फॉर्म भरुन कागदत्रासंह पोस्टाद्वारे पाठवून द्या

उमेदवार ज्या विभागात वास्तव्यास असेल त्या विभागातील आरबीआयच्या कार्यालयात अर्ज पाटवा

अर्जाची फी

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामधील ऑफिस अटेंडेंट पदासाठी अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील, आर्थिक मागास प्रवर्ग, ओबीसी उमेदावारांसाठी 450 रुपये तर एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 50 रुपये फी ठेवण्यात आली आहे.

नोटिफिकेशन नुसार परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची विविध विभागात पोस्टिंग केली जाईल. अहमदाबाद मध्ये 50, बंगळुरूमध्ये 28, भोपाळमध्ये 25, चंडीगढ़मध्ये 31, चेन्नईमध्ये 71, हैदराबादमध्ये 57, जयपूर 43, कानपूरमध्ये 69, मुंबईत 202, नागपूरमध्ये 55 आणि नवी दिल्ली मध्ये 50 पदे निर्धारित करण्यात आली आहेत.इतर माहितीसाठी उमेदवारांनी आरबीआयच्या वेबसाईटला भेट द्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.