लोकशाही न्युज नेटवर्क
मुंबई – मुंबईतील समता नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोईसर परिसरातील बिहारी टेकडी सोसायटीत एका घरात भेसळयुक्त दुधाचा कारखाना सीपी नियंत्रण गुन्हे शाखेच्या पथकाने उद्ध्वस्त केला आहे. या कारखान्यातून १०४० लिटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले आहे. हे भेसळयुक्त दूध गोकुळ आणि अमूल या ब्रँडेड कंपनीच्या पॅकिंगमध्ये पॅकिंग करून मोठमोठ्या हॉटेल्स, बड्या सोसायट्यांना बिनदिक्कतपणे पुरवले जात होते. भेसळीच्या रॅकेटमध्ये ४ पुरुष आणि १ महिला सामील आहे. अटक करण्यात आलेली महिला पाकिटात दूध भरायची, तर इतर ४ पुरुष आरोपी दुधात भेसळ करून बाजारात पुरवठा करायचे. क्राइम ब्रँचच्या तपासात असे आढळून आले की, भेसळयुक्त दुधाचा हा कारखाना सुमारे ३ महिने चालवला जात आहे. हे लोक ब्रँडेड दुधाच्या पिशवीत पाणी आणि रसायन टाकून दूध घट्ट करायचे आणि नंतर ते पॅकिंग करून हॉटेल्स आणि मोठ्या चहाच्या टप-यांवर विकायचे आणि सोसायटीत सप्लाय करायचे. गुन्हे शाखेने सुमारे १ हजार ४० लिटर भेसळयुक्त दूध जप्त केले आहे.
हजारो लिटर भेसळयुक्त दूध जप्त
९ जानेवारीच्या मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिस आयुक्तालयाला याबाबत माहिती मिळाली होती. कंट्रोलकडून तक्रार मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा, भंडारी, खारवीचे एपीआय रुपेश दरेकर यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलिस हवालदार राऊत आणि अन्न सुरक्षा अधिकारी तुषार घुमरे आणि सुमित खांडेकर आणि हवालदार वाळेकर, पोना पाटील, जाधव यांनी या प्रकरणी तक्रार नोंदवली. कारखान्यातील भेसळयुक्त दुधाचा पर्दाफाश करताना हजारो लिटर भेसळयुक्त दूध व पॅकिंग मशीन, टब, मेणबत्त्या व इतर साहित्य जप्त केले.
फेसिंग टॅकल जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी विराय रोशैया (४९), श्रीनिवास नरसिंग वडला कोंड (३८), नरेश मरैया जडला (२९), अंजय्या गोपालू बोडुपल्ली (४३) आणि रामा सत्यनारायण गज्जी (३०) यांच्यावर कलम ४२०, २७२, २८४, २७३, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४८५, ३, ४ सह १८, २६, २७, ३१, अन्न सुरक्षा मानक कायद्यांतर्गत तत्काळ कारवाई करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध विभागाच्या पथकाने हा छापा टाकला. या कारवाईबाबत समता नगरला माहिती नव्हती. आपल्या हद्दीत भेसळयुक्त दुधाचा कारखाना खुलेआम सुरू असल्याची माहितीही समता नगर पोलिसांना नाही. या कारवाईनंतर समता नगर पोलिस खडबडून जागे झाले आहेत. वास्तविक, समता नगर येथील हेड पोयसर भागातील बिहारी टेकडी मैदानाजवळ बांधलेल्या एका सोसायटीत सुमारे ३ महिन्यांपासून काही लोक मिळून दुधात भेसळीचे रॅकेट चालवत होते. पूर्वी हे लोक गोकूळ आणि अमूल कंपनीच्या ब्रँडेड दुधाच्या पिशव्या खरेदी करायचे.