“1 लाख ST कर्मचारी अंगावर आले तर काय करणार ?”, राज ठाकरेंचा सवाल

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज ठाकरे  आज नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत.  ते पुढचा दौरा विदर्भ, कोकण या ठिकाणी दौरा करणार आहेत, सध्या पक्ष बांधणी सुरु असल्याचं त्यांनी नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितलं. यावेळी राज ठाकरेंना ST कर्मचाऱ्यांच्या संपावरती प्रश्न विचारला असता ते म्हणाले की,  एसटी कर्मचारी युनियन बाजूला सारून संप करीत आहेत. लोकांनी राज्याच्या कारभार तुमच्या हातात दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलणे आवश्यक आहे.

चार महिने पगार नाही. मात्र चार महिने भ्रष्ट कारभारात पैसे आले नाहीत की यांचा जीव कासावीस होतो. ग्रामीण भागाला जोडणारी एसटी महत्वाची सेवा आहे. जोपर्यंत एसटी मधील भ्रष्ट्राचार थांबत नाही तोपर्यंत उन्नती शक्य नाही. 1 लाख कर्मचारी अंगावर आले तर, काय करणार असा सवाल करीत राज यांनी राज्य सरकारला कोपरखळ्या मारल्या. तसेच एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लावणे योग्य नाही. तसेच यासंबधी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार असल्याचेही राज यांनी म्हटले

 

Leave A Reply

Your email address will not be published.