जळगाव – राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेमार्फत घेण्यात येणारी MHT-CET परीक्षा, 2020 ही परीक्षा दिनांक 1 ते 9 ऑक्टोबर, 2020 या कालावधीत फिजिक्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजी (PCB ग्रुप) व दिनांक 12 ते 20 ऑक्टोबर, 2020 या कालावधीत फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स (PCM ग्रुप) ची परीक्षा जळगाव जिल्ह्यातील पाच परीक्षा उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील आयओएन डिजिटल झोन, आयडीझेड, शिरसोली रोड, श्री. गुलाबराव देवकर कॉलेज कॅम्पस, जळगाव, केसीई सोसायटीचे इंन्सि्टट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲन्ड रिसर्च, जळगाव, श्री. गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, जळगाव, जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲन्ड मॅनेजमेंट, जळगाव आणि श्री संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ॲन्ड टेक्नॉलॉजी, भुसावळ, जि. जळगाव या पाच उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.