८.३ कोटी महिलांना ३ महिन्या पर्यंत गॅस सिलिंडर मोफत

0

नवी दिल्लीः लॉकडाऊनच्या काळात एकही व्यक्ती उपाशी राहू नये, याची काळजी केंद्र सरकारकडून घेतली जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत ३ महिन्यांपर्यंत एलपीजी घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा केली आहे. त्याचा ८.3 कोटी महिलांना फायदा होणार आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत ८.3 कोटी बीपीएल कुटुंबीयांना ती महिन्यांपर्यंत मोफत सिलिंडर मिळणार आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत गॅस कनेक्शन दिलं जातं. या योजनेत बदल करण्यात आला असून, १ ऑगस्ट २०१९पर्यंत जोडलेल्या ग्राहकांना आता याचा फायदा घेता येणार आहे. तेल कंपन्यांनी जुलै २०२०पर्यंत ईएमआय पुनर्प्राप्ती योजना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.