१७ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष देवून पळविले; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील पिंप्राळा भागातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पिंप्राळा भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. २८ डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मुलगी घरी असतांना संशयित आरोपी करण अर्जून राठोड रा. घाणेगाव तांडा ता. सोयगाव जि. औरंगाबाद याने लग्नाचे आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आला. मुलीच्या कुटुंबियांनी परिसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली परंतू ते आढळून आली नाही.

दरम्यान अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी संशयित आरोपी करण अर्जून राठोड याच्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाळ देशमुख हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.