१५ मार्चपर्यंत बहिणाबाई विद्यापीठ बंद राहणार

0

जळगाव । जिल्ह्यासह शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. कोरोना संसर्गाची साकळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ११ मार्च रोजी रात्री ८ ते १५ मार्च सकाळी ८ पर्यंत जनता कर्फ्यु जाहीर केला असून या कालावधीत विद्यापीठ बंद राहणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी जळगाव शहर महानगर पालिका हद्दीतील शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, परिसंस्था व विद्यापीठ १५ मार्च रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहतील असे कळविण्यात आले आहे. त्यानुसार विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव प्रा. बी.  व्ही. पवार यांनी परिपत्रक प्रसिध्द केले आहे.

जनता कर्फ्युच्या काळात पुर्व नियोजित परीक्षांचे ऑनलाईन, आफॅलाईन कामकाजाची कार्यवाही सुरू राहील. संबंधीत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत परीक्षेच्या कामासाठी उपस्थित रहावे असेही आवाहन परीपात्राद्वारे करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.