होळी सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वे गाड्या धावणार

0

भुसावळ :-होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे विभागाने काही जादा गाड्यांचे नियोजन केले असून, प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन काही विशेष गाड्यांदेखील या कालावधीत धावणार आहेत. मुंबई-पटना, वाराणसी, मंडुआडीह दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

दि. 19 मार्च रोजी सीएसएमटी – वाराणसी स्पेशल- गाडी क्र. 02067 ही विशेष गाडी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहाटे 5.10 वाजता रवाना होऊन दुसर्या दिवशी दुपारी 12 वाजता वाराणसी पोहचेल. गाडी क्र. 02068 सुपरफास्ट स्पेशल दि.20 मार्च 19 को दुपारी 1.55 वाजता वाराणसी येथून रवाना होऊन दुसर्या दिवशी दुपारी 4.20 वाजता छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस पोहचेल.
ही गाडी दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, माणिकपुर, अलाहाबाद या स्थानकांवर थांबेल. या गाडील 8 स्लिपर, 2 तृतीय वातानुकूलित, 7 जनरल डबे असतील.

सीएसटीएम – पटना सुपरफास्ट स्पेशल- गाडी क्र. 02053 सुपरफास्ट स्पेशल छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. 22 मार्च रोजी दुपारी 2.20 वाजता रवाना होऊन दुसर्या दिवशी सायं. 6.30 वाजता पोहचेल. गाडी क्र. 02054 सुपरफास्ट स्पेशल दि.23 मार्च 19 रोजी रात्री 11.35 वाजता पटना येथून रवाना होऊन तिसर्या दिवशी सकाळी 6.15 वाजता छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस पोहचेल. ही गाडी दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, मानिकपुर, इलाहाबाद छियोंकी, पंडित दिनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर स्थानकांवर थांबेल. या गाडीला 8 स्लिपर, 2 तृतीय वातानुकूलित, 7 जनरल डबे असतील.

सीएसएमटी- मंडुआडीह एसी स्पेशल- गाडी क्र. 01085 एसी स्पेशल दि. 20 मार्च 2019 रोजी सीएसएमटी येथून पहाटे 12.20 वाजता रवाना होऊन दुसर्या दिवशी पहाटे 4.45 वा. मंडुआडीह पोहचेल. गाडी क्र. 02088 सुपरफास्ट एसी स्पेशल दि. 21 मार्च 19 रोजी मंडुआडीह येथून सकाळी 6.30 वाजता रवाना होऊन दुसर्या दिवशी सकाळी 8.20 वाजता छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस पोहचेल.
ही गाडी दादर, कल्याण, इगतपुरी, नासिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपुर, कटनी, सतना, माणिकपुर, अलाहाबाद, ज्ञानपुर स्थानकांवर थांबेल. या गाडीला 13 थ्री टीयर डबे असतील. प्रवाशांनी उत्सवात या गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.