हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या

0

पाळधी, ता.धरणगाव (वार्ताहर) :  हैदराबाद येथील रामशाबाद येथील पशुवैद्यकीय महिला डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर अमानुष अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने सदर निंदनीय घटनेचा निषेध करून सामाजिक कार्यकर्ते दिपकराव सावळे यांनी पाळधी पोलीस दूर क्षेत्रात अपराध्यांना फाशीची शिक्षा व्हावी सदर खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा व तपासात दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी याबाबत निवेदन पाळधी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार नसीम तडवी नीलिमा हिवराळे चंद्रकांत पाटील पोलीस कॉन्स्टेबल किशोर चंदनकर यांना देण्यात आले

यावेळी पत्रकार गोपाळ सोनवणे भूषण महाजन धार येथील सरपंच उत्तम सोनवणे दोन गावचे माजी उपसरपंच सुरेश पाटील राजू सोनवणे व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.