हिंदु जनजागृती समितीचे प्रांतांना निवेदन

0

भुसावळ | प्रतिनिधी
हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव ऍड. संजिव पुनाळेकर यांना नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्ये प्रकरणी सीबीआयने अटक केली आहे. या कारवाईचा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दि. २७ रोजी निषेध कारण्यात येवून प्रातअधिकारी यांच्यामार्फत केंद्रीय गृहमंत्री व मुख्यमंत्री निवेदन सादर करण्यात आले. सीबीआयने दहा महिन्यांपूर्वी एका संशयित आरोपीने दिलेल्या माहितीवरुन ऍड. पुनाळकर यांना अटक करण्यात आले आहे. ही मकारवाई चुकीची आहे. सीबीआयची ही वागणूक संशयास्पद व हिंदुत्ववाद्यांवर दबाबतंत्र निर्माण करणारी असल्याचे निवेदनात नमुद केले आहे. निवेदन सादर करतांना समितीचे उमाकांत (नमा) शर्मा, भुषण महाजन, उमेश जोशी, शुभम पचेरवाल, भुषण कोळी, पियुश महाजन, सागर भोट, मनोज चौधरी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.