हरेश्वर कॉलनीत घरफोडी : सव्वा लाखांचे दागिने लांबविले

0

जळगाव । शहरातील रिंगरोडवरील हरेश्वर कॉलनीत कुटुंबिय घराच्या गच्चीवर झोपलेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दरवाज्याचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करत सव्वा लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून पोबारा केल्याची घटना ही रात्री 3.50 वाजेच्या सुमारास घडली. गच्चीवर झोपलेल्या कुटुंबियांनी दरवाजाचा आवाज आल्याने त्यांनी उठून पाहिल्यानंतर तीन चोरटे मोटारसायकलीने पळतांना दिसून आले.  याबाबत जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात दिवसेंदिवस घरफोड्यांचे प्रमाणामध्ये वाढ होत आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यापासून जवळच रिंगरोडवरील हरेश्वर कॉलनीतील वृंदावन अपार्टमेंटमध्ये स्नेहा नितीन हरीव्यासी या मुलगा धय व स्नेहा यांच्या आई मधुबेन हे तिघे राहतात. उन्हाळाच्या सुट्टीनिमित्त त्यांच्याघरी बडोदा येथील बहिण नम्रता या त्यांच्या मुलांसह आलेल्या आहेत. सोमवारी रात्री उशिरापर्यंत जेवण झाल्यानंतर सार्वजन घराच्या गच्चीवर झोपले होते. त्यामुळे त्यांनी घराच्या दरवाजाला कुलूप लावले होते. दरम्यान घराचा दरवाजा बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी घरातील कपाटातील दागिने तसेच स्नेहा यांच्या बहीण नम्रता यांच्या बॅगेतील सोन्या-चांदीचे दागिने लांबवून नेले.स्नेह यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.