हद्दपार आरोपी विष्णू परशुराम पथरोड पोलिसांच्या जाळ्यात

0
भुसावळ (प्रतिनिधी)-  वर्षभरासाठी हद्दपार असतानाही शहरात वावरणार्या विष्णू परशुराम पथरोड (21, रा.72 खोली, वाल्मिक नगर, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. आरोपीने कारवाईदरम्यान पोलिसांशी हुज्जत घालत शासकीय कामकाजात अडथळा आणल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपअधीक्षक गजाजन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र बिर्हाडे, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने केली.

Leave A Reply

Your email address will not be published.