स्पेक्ट्रम इलेक्टीक कंपनीतील चोरीप्रकरणी दोघे जाळ्यात..

0

जळगाव : एमआयडीसीतील स्पेक्ट्रम इलेक्टीक कंपनीतील दोघांनी छोटा हत्ती  वाहन चालकाच्या मदतीने तांब्याच्या पट्टया व पितळी कॉईलच्या चोरीचा प्रयत्न 20 जून रोजी केला होता. मात्र ड्युटीवरील सिक्युरिटीच्या सतर्कतेत्ने चोरीचा हा प्रयत्न उघड झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेच्या दिवशी चालक दिपक यशवंत चौधरी यास त्याच्या ताब्यातील व गुन्ह्यात वापरलेले वाहन मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती.तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. घटनेच्या दिवसापासून जिवन चौधरी (सुपरवायझर) व हितेश कोल्हे (कामगार) हे दोघे फरार झाले होते. पोलिस त्यांच्या मागावर होते. 2 लाख 52 हजाराचा मुद्देमाल तपासकामी हस्तगत करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पो.नि. शिकारे यांच्या सहका-यांनी दोघांना काल रात्री दहा वाजेच्या सुमारास शिताफीने ताब्यात घेत अटक केली. दोघांना न्या. ए.एस.शेख यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना 1 जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.