स्त्री जातीचे अर्भक आढळले रस्त्यावर

0

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

रावेर येथील कर्जोत-अहिरवाडी रस्त्यावर स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ उडाली आहे. या अर्भकाला कोणीतरी नकळत रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडपात फेकून दिल्याचा अंदाज आहे.

हे बालक पाच दिवसाचे असल्याचा अंदाज आहे. कोणी तरी अज्ञाताने रस्त्याच्या साईट पट्याला लागून असलेल्या झुडपात हे अर्भक टाकल्याचा अंदाज आहे. रावेर कडून आहीरवाडीला जात असतांना एकाला रडण्याचा आवाज आल्याने स्त्री जातीच बालक असल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी माहिती कळताच पंचायत समिती उपसभापती यांचे पती संदीप सवाळे यांना समजताच त्यांनी स्त्री जातीचे अर्भक रावेर ग्रामीण रुग्णालयात आणले असून यावर पुढील उपचार सुरु आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.