सौ.र.ना.देशमुख महाविद्यालयाचा उमविच्या ‘टाॅप टेन’मध्ये समावेश

0

पुरूष संघाने मैदानी स्पर्धा, क्राॅसकंट्री, भारत्तोलन, शक्तीतोल, शरीरसौष्ठव या क्रीडा प्रकारांमध्ये विजयी कामगिरी

भडगाव ;- येथील सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाने सलग सातव्या वर्षी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘टाॅप टेन’ महाविद्यालयांमध्ये स्थान पटकावले
आहे. सन 2017-18 मध्ये विभागाला नववा क्रमांक प्राप्त झाला आहे.
यावर्षी महाविद्यालयाच्या पुरूष संघाने मैदानी स्पर्धा, क्राॅसकंट्री, भारत्तोलन, शक्तीतोल, शरीरसौष्ठव या क्रीडा प्रकारांमध्ये आंतरमहाविद्यालयीन पातळीवर विजयी कामगिरी बजावली आहे. तर बाॅक्सिंग व मल्लखांब या क्रीडा प्रकारांमध्ये उपविजयी ठरले आहे. योगा व जलतरणमध्ये खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. महिलांच्या क्राॅसकंट्री व योगा संघाने प्रथम तर कबड्डी व मैदानी स्पर्धेत तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

याबरोबरच महाविद्यालयाने विविध क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन सुद्धा केले. त्यात आंतरमहाविद्यालयीन योगा (पुरूष व महिला), भारत्तोलन, शक्तीतोल व शरीरसौष्ठव (पुरूष) तसेच उमवि आंतरविभागीय भारत्तोलन, शक्तीतोल व शरीरसौष्ठव (पुरूष) आणि उमवि आंतरमहाविद्यालयीन भारत्तोलन व शक्तीतोल (महिला) या स्पर्धांचा समावेश आहे.
क्रीडा विभागाच्या वतीने खेळाडूंच्या संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. मैदानावर उपस्थित न राहणार्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यामुळे 100 खेळाडूंची संख्या वाढून 150 झाली. 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. तसेच विविध स्पर्धांची मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्यात आली.

विशेष उल्लेखनीय – यावर्षी क्रीडा विभागातील एकूण 8 खेळाडूंना विविध विभागांमध्ये नोकरी प्राप्त झाली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल खेळाडूंना साहाय्य व्हावे या हेतूने विविध योजनांची सुरूवात करण्यात आली. या योजनांतर्गत साबीर खाटीक या खेळाडूच्या गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत करण्यात आली.
वर्षभरात विभागाला जळगाव विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक प्रा. डाॅ.केशव तुपे, उमवि एल.आय.सी.समिती, संस्थेचे चेअरमन व पदाधिकारी अशा एकूण 16 मान्यवरांनी भेटी दिल्या.

सर्वोत्कृष्ट पुरूष खेळाडू म्हणून अभिषेक अशोक पाटील व सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून सीमा शांताराम माळी यांना पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या पदाधिकार्यांनी सन्मानित केले. विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ, चेअरमन नानासाहेब संजय ओंकार वाघ, व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही.टी.जोशी, ज्येष्ठ संचालक आण्णासाहेब नानासाहेब देशमुख, सर्व पदाधिकारी, प्राचार्य डाॅ. एन.एन.गायकवाड व प्राध्यापक यांनी शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. दिनेश तांदळे व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.