सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण ; जाणून घ्या नवे दर

0

मुंबई । सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ आता थांबलेली आहे. मंगळवारी सोन्याच्या किंमतीत मोठीच घसरण झाली. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 1,317 रुपयांनी स्वस्त झाला आहे. त्याच वेळी, एक किलो चांदीची किंमत ही 2,943 रुपयांनी कमी झाली. रुपयाच्या मजबुतीमुळे स्थानिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती खाली आल्या असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सोन्याच्या किंमती येत्या काही दिवसांत आणखी घसरतील.

सोन्याचे नवे दर

मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमधील 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 56,080 रुपये वरून 54,763 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आली आहे. या काळात प्रति 10 ग्रॅमच्या किमतींमध्ये 1,317 रुपयांनी घट झाली आहे. त्याचबरोबर मुंबईतील 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 54528 रुपयांवर आली आहे.

चांदीचे नवे दर

मंगळवारी सोन्याप्रमाणे चांदीच्या भावातही मोठी घसरण झाली आहे. दिल्लीत एक किलो चांदीची किंमत 76,543 रुपयांवरुन 73,600 रुपयांवर आली आहे. या कालावधीत चांदीच्या किमतींमध्ये 2,943 रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर मुंबईतील चांदीचा हा दर प्रति किलो 72354 रुपयांवर आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.