सीआरपीएफ होती म्हणून वाचलो : अमित शहा

0

नवी दिल्ली: – कोलकात्यात मंगळवारी रोड शो दरम्यान भडकलेल्या हिंसेचे बिंग भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तृणमूल काँग्रेसवर फोडले. सीआरपीएफची सुरक्षा नसती तर कोलकात्यातून जिवंत बाहेर पडलो नसतो, असं त्यांनी आज एका पत्रकार परिषदेद्वारे सांगितलं. तसेच तृणमूलच्या कार्यकर्त्यांनीच पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांचा फोटो फोडल्याचा आरोपही त्यांनी केला.

देशभरात आतापर्यंत लोकसभा निवडणुकांचे सहा टप्पे पार पडले मात्र कुठेही हिंसा झाली नाही मग पश्चिम बंगलमध्येच हिंसा कशी काय झाली? याचाच अर्थ असा की तृणमूल या हिंसेसाठी कारणीभूत आहे, असेही ते म्हणाले. आमच्या कार्यकर्त्यांना भडकावण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती, असा आरोप शहा यांनी केला. ममता बॅनर्जी यांनी भाजप आणि माझ्यावर एफआयआर दाखल करण्याची धमकी दिली आहे. आम्ही ममता दीदींच्या धमकीला भीक घालत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

कालच्या रॅलीत एक नव्हे तर तीन हल्ले झाले. तिसऱ्या हल्ल्यात जाळपोळ करण्यात आली. केरोसीन बॉम्ब फेकण्यात आले. दगडफेक करण्यात आली. काल जर सीआरपीएफची सुरक्षा नसती तर कोलकात्यातून जिवंत बाहेर पडता आलं नसतं, असंही त्यांनी सांगितलं. तसेच ईश्वरचंद विद्यासागर यांच्या फोटो भाजपने फोडल्याचा तृणमूलचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला. आम्ही रस्त्याच्या बाहेर होतो. कॉलेजच्या आत गेलोच नाही, मग आम्ही फोटो फोडण्याचा प्रश्न येतोच कुठे? तृणमूलच्याच कार्यकर्त्यांनी हा फोटो फोडल्याचं त्यांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.