सिलिंडरपाठोपाठ पेट्रोल- डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ ; जाणून घ्या नवीन दर

0

मु्ंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी वर्षाच्या पहिल्याच दिवशी घरगुती गॅसची दरवाढ केल्यानंतर आज गुरुवारी ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा दणका दिला आहे. आज दिल्लीत पेट्रोल ११ पैसे तर डिझेल प्रति लीटर १४ पैशांनी महागले आहे. मुंबईत पेट्रोल ८ पैसे आणि डिझेलच्या किमतीत प्रति लीटर १२ पैसे वाढ झाली. या दरवाढीने बाजारात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे. आज  मुंबईत पेट्रोल ८०.८७ रुपये आणि डिझेल ७१.४३ रुपये झाला आहे. कंपन्यांनी बुधवारी स्वयंपाकाच्या गॅस सिलींडरचा दर १९ रुपयांनी वाढवला होता.

दिल्लीत पेट्रोल – ७५.२५ रुपये तर  डिझेलचा दर प्रति लीटर ६८.१० रुपये

कोलकात्यामध्ये पेट्रोल – ७७.८७ रुपये तर  डिझेलचा दर प्रति लीटर ७०.४९  रुपये

चेन्नईमध्ये पेट्रोल  ७८. २० आणि डिझेल ७१. ९८ रुपये

Leave A Reply

Your email address will not be published.