सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल स्वस्त ; जाणून घ्या आजचा दर

0

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात मागील तीन ते चार दिवसात खनिज तेलाचा किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली. यामुळे मुंबईत पेट्रोल प्रति लीटर ८१.३९ रुपये झाले असून डिझेल ७२.४२ रुपये आहे. आज पेट्रोल १० पैसे तर डिझेल ५ पैसे स्वस्त झाले.रविवारी कंपन्यांनी पेट्रोल १० ते १२ पैसे आणि डिझेल ६ ते ७ पैसे कपात केली होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील तीन ते चार दिवसात खनिज तेलाचा किमतीत घसरण झाली आहे.  त्यामुळे खनिज तेल आयातीचा खर्च कमी होणार आहे. परिणामी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात सलग दुसऱ्या दिवशी कपात केली.

मुंबईत पेट्रोल प्रति लीटर ८१.३९ रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर ७२.४२ रुपये आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलसाठी ग्राहकांना ७५.८० रुपये मोजावे लागत असून डिझेल ६९.०६ रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोल ७८.३९ रुपये आणि डिझेलचा भाव ७१.४३ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलसाठी ग्राहकांना ७८.७६ रुपये आणि डिझेल ७१.४३ रुपये मोजावे लागतील.

Leave A Reply

Your email address will not be published.