सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

0

नवी दिल्ली :  पेट्रोलियम कंपन्यांनी आज (शनिवार) सलग चौदाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ कायम ठेवल्याचे दिसून आले. दरम्यान, आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात ५१ पैशांची तर डिझेलच्या दरात ६३ पैशांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर मुंबईत आज पेट्रोल ८५.६८ रुपये प्रति लिटर व डिझेल ७६.१ रुपये प्रति लिटर झाले आहे. तर,दिल्लीत पेट्रोलचे दर ७८.८८ रूपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ७७.६७ रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत.

चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ८२.२७ रूपये प्रति लिटर आणि ७५.२९ रूपये झाले आहेत, कोलकात्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन ते अनुक्रमे ८०.६२ रूपये प्रति लिटर आणि ७३.०७ रूपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत.

जूनपूर्वीच्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली नव्हती. या काळातील लॉकडाउनच्या कालावधीत इंधनाचा वापरही मोठय़ा प्रमाणात कमी झाला होता. मात्र, आता गेल्या १४ दिवसांपासून पेट्रोल दरवाढीचं सत्र मात्र कायम आहे. तर, एकूण १४ दिवसांमध्ये पेट्रोल ७.६० रुपये व डिझेल ८.२८ रुपये प्रति लिटर वाढले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.