सर्वसामान्यांना दिलासा ! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी कपात, जाणून घ्या आजचा दर

0

मुंबई । सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी कपात केली आहे. पेट्रोलच्या दरात 15 पैसे प्रतिलिटर आणि डिझेलच्या दरात 19 पैशांनी कपात करण्यात आली. त्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल 26 पैसे प्रतिलिटर घटून 81.14 रुपये आणि डिझेल 35 पैशांनी कमी होऊन 72.02 रुपये प्रति लिटर झाले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्याने आणि रुपयाला बळकटी मिळाल्याने देशांतर्गत बाजारात पेट्रोल डिझेलच्या किंमती खाली येण्याची शक्यता तज्ञ वर्तवत आहेत. क्रूडमध्ये 20 टक्के कपात केल्यास पेट्रोल आणि डिझेलमध्ये आणखी 5 टक्क्यांची कपात होऊ शकते. तसे झाले तर पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर अडीच ते तीन रुपयांनी स्वस्त होऊ शकतात.

देशातील मोठ्या शहरांमध्ये आजच्या पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती काय आहेत ते जाणून घ्या.
दिल्ली पेट्रोल 81.04 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 72.02 रुपये आहे.
मुंबई पेट्रोलची किंमत 87.82 रुपये आणि डिझेलची किंमत 78.48 रुपये प्रतिलिटर आहे.
कोलकाता पेट्रोल 82.67 रुपये आणि डिझेल 75.52 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नई पेट्रोलची किंमत 84.21 रुपये आणि डिझेलची किंमत 77.40 रुपये प्रतिलिटर आहे.
नोएडा पेट्रोल 81.64 रुपये तर डिझेल 72.33 रुपये प्रतिलिटर आहे.
गुरुग्राम पेट्रोल 79.32 रुपये तर डिझेल 72.49 रुपये प्रतिलिटर आहे.
लखनऊ पेट्रोल 81.54 रुपये तर डिझेल 72.23 रुपये प्रतिलिटर आहे.
पटना पेट्रोल 83.79 रुपये तर डिझेल 77.40 रुपये प्रतिलिटर आहे.
जयपूर पेट्रोल 88.29 रुपये तर डिझेल 80.94रुपये प्रतिलिटर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.