सरस्वती फोर्डचा तृतीय वर्धापन दिनी एक अनोखा उपक्रम

0

वुमन ऑफ दि इयर अवार्ड

जळगांव,दि. 28-
सरस्वती फोर्डच्या वर्धापन दिनानिमित्त सरस्वती फोर्ड व स्फूर्ती बहुउद्द्ेशिय संस्था यांच्या संयुक्तविद्माने विविध क्षेत्रातील कर्तृत्वान महिलांचा वुमन ऑफ द इयर पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
आजवर ़सरस्वती फोर्डने वर्धापन दिनी वेगवेगळे उपक्रम राबविलेले आहेत. केवळ महिलांचा सन्मान व्हावा, असा विचार न करता आज सर्वच कार्य क्षेत्रात महिलांचे प्रमाण 50 टक्के आहे. हा उद्द्ेश ठेवून वर्धापनदिनी विविध क्षेत्रातील महिलांना वुमन ऑफ दि इयर 2018 ने पुरस्कृत करण्यात आले. या सन्मानाने महिला भारावून गेल्यात. पुरस्कार वितरण सोहळ्यास आ. सुरेश भोळे, अप्पर पोलिस अधिक्षक लोहित मताणी, सरस्वती व सरस्वती फोर्डचे संचालक मुकेश टेकवानी, भावना मुकेश टेकवानी, धवल टेकवानी, पूजा धवल टेकवानी उपस्थित होते.
जळगांव जिल्हयातील महिलांचा सन्मान
1) रजनी संजय सावकारे(सामाजिक) 2) डॉ. प्रिती अग्रवाल(डायरेक्टर ऑफ रायसोनी ग्रृप ऑफ बिजनेस मॅनेजमेंट) (शैक्षणिक) 3) ज्योती लीलाधर राणे (सांस्कृतीक) 4) स्वाती अविनाश सारडा (डेप्युटी जनरल मॅनेजर जळगांव पीपल्स बँक ) 5) कल्पना गणेश वर्मा (सांस्कृतीक) 6) माधुरी प्रभाकर कुलकर्णी (आरोग्य) 7) पुष्पा कैलास चौधरी (सामाजिक) 8) अनिता दिनेश निवाणे (सामाजिक) 9) हर्षाली प्रवीण चौधरी (सामाजिक) 10) अर्चना अशोक येवले (सांस्कृतीक)
सरस्वती फोर्डने कर्तृत्ववान महिलांचा वूमन ऑफ दि इयर पुरस्कार देऊन गौरव केला; ही अत्यंत अभिमानाची बाब असून आज स्त्री विना पुरूष अधुरा आहे, असे नवविचार आमदार सुरेश भोळे(राजूमामा) यांनी मांडलेत. सर्व क्षेत्रांमध्ये उच्चपदस्थ पदावर 50% महिला असाव्यात. कारण महिला ज्या भावनिक पध्दतीने काम करतात. त्याचा सकारात्मक परिणाम कार्यालयीन कामावर होतो. व त्यामुळे कार्यालयांमध्येही एक कौटुबिंक वातावरणाची निर्मिती होते, असे विचार अप्पर पोलिस अधिक्षक लोहित मतानी यांनी मांडलेत. या प्रसंगी सरस्वती डेअरी व सरस्वती फोर्डचे संचालक मुकेश टेकवानी व धवल टेकवानी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सायंकाळी सरस्वती समुहातील सदस्य व त्यांच्या कुटुंबियांकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात फोर्ड समुहातील सहकार्यांनाही एम्प्लॉययी एक्सीलन्स अवॉर्ड व इ. पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आले.
सरस्वती समुहाचे अथक परिश्रमाचे फळ म्हणजे फोर्ड परिवारास आजवर 1200 हुन अधिक ग्राहक जुळले आहे. सरस्वती फोर्ड व फोर्डच्या गाड्यांना अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असून सरस्वती समुह त्यांचा सदैव ऋणि राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.