सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज ! 1 एप्रिलपासून पगार वाढणार; जाणून घ्या किती फायदा?

0

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. 1 एप्रिलपासून कामगार कायद्यात होणाऱ्या बदलानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ होणार आहे. केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी बर्‍याच काळापासून 7 व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा करीत आहेत. या सर्वांना यंदा खूप दिलासा मिळणार आहे. 1 एप्रिल 2021 पासून देशात नवीन वेतन संहिता लागू होण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर कर्मचार्‍यांच्या पगाराची रचना बदलली जाणार आहे.

या बदलाचा थेट परिणाम कर्मचार्‍यांच्या हातात येणाऱ्या पगारावर होईल. नवीन नियमांनुसार, आपला मूलभूत पगार एकूण सीटीसीच्या 50 टक्के असेल. यासह आपला पीएफ योगदान देखील वाढणार आहे. याशिवाय सातव्या वेतन आयोगाची पगारात अंमलबजावणी झाल्यानंतर तुमचा पगारही वाढेल.

1 कोटी कर्मचार्‍यांना फायदा होणार

2014 मध्ये आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या गेल्या, पण अद्याप त्या अंमलात आलेल्या नाहीत. सरकार लवकरच यावरही निर्णय देणार आहे. या निर्णयाचा देशातील सुमारे 1 कोटी कर्मचार्‍यांना फायदा होणार आहे. यात 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 58 लाख निवृत्तीवेतनधारकांचा समावेश आहे.

किमान पगारामध्ये 11 रुपयांची वाढ

आयोगाच्या शिफारशीनुसार सुरुवातीच्या कर्मचार्‍यांचे किमान वेतन 7000 रुपयांवरून 18000 रुपये केले गेले आहे. याशिवाय क्लास-वन अधिकाऱ्याचा किमान पगार 56100 रुपये निश्चित करण्यात आलाय. सातव्या वेतन आयोगांतर्गत वेतन, भत्ते, पेन्शनमध्ये 23.55 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शिफारस केलीय.

नवीन पे-मॅट्रिक्स सिस्टीम तयार

सातव्या वेतन आयोगाने नव्या Pay Matrix ची घोषणा केलीय. Pay Matrix सह, केंद्रीय कर्मचारी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस संपूर्ण करिअरच्या वाढीचे मूल्यांकन करू शकतील. नागरी कर्मचारी, संरक्षण दले आणि लष्करी नर्सिंग सर्व्हिससाठी स्वतंत्र Pay Matrix तयार केले गेलेय. आता त्या आधारे कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये वाढ होईल. त्याशिवाय कमिशनने एक नवीन Pay Matrix देखील जाहीर केला आहे, ज्याद्वारे कर्मचारी त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीस संपूर्ण कारकिर्दीतील वाढीचे मूल्यांकन करू शकतील. यामध्ये सर्व क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र Pay Matrix तयार करण्यात आलाय.

Leave A Reply

Your email address will not be published.