सफाई मक्तेदाराच्या कामगारांचे पुन्हा कामबंद

0
शहरात घाणीचे साम्राज्य ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
जळगाव- शहरातील साफसफाई आणि कचरा संकलनासाठी मनपा प्रशासनाने नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीला मक्ता दिला आहे. मात्र मनपाने दोन महिन्याचे वेतन अदा के ले नसल्याच्या कारणावरुन सोमवारी कामगारांनी कामबंद आंदोलन केले. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग दिसून येत आहेत. साफसफाई होत नसल्याने नाग रिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान,कामगारांनी अचानक कामबंद केल्यामुळे मक्तेदाराला नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिक ारी डॉ.विकास पाटील यांनी दिली.
 शहरातील साफसफाईसाठी मनपाने वॉटरग्रेस कंपनीला पाच वर्षासाठी 75 कोटींचा एकमुस्त मक्ता दिला आहे. मक्ता दिला असतानाही शहरात साफसफाई होत नसल्याने  गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांसह चक्क पदाधिकारी आणि नगरसेवकांची देखील ओरड आहे. मागील दोन-तीन महिन्यापूर्वीही कामगारांनी अचानक कामबंद केले होते.  आता पुन्हा कामगारांनी कामबंद केले आहे. त्यामुळे सफाई मक्तेदाराबाबत कमालीची नाराजी पसरली आहे. मनपाने डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे वेतन अदा न के ल्यामुळे मक्तेदाराने कामबंद ठेवण्याचा पवित्रा घेतला असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे मक्तेदाराने कामगारांचे पीएफ अदा न केल्याने वेतन अदा केले गेले  नसल्याचे सांगण्यात येत आहे.
शहरात अस्वच्छता
मनपा प्रशासन आणि सफाई मक्तेदाराच्या वादामुळे  शहराची कोंडी होत आहे. मक्तेदाराकडे 400 कामगार आहेत. नेहमी प्रमाणे सर्व कामगार त्या-त्या प्रभागात काम क रण्यासाठी आले होते. मात्र मक्तेदाराच्या प्रतिनिधींनी मनपा जो पर्यंत वेतन करणार नाही तो पर्यंत कामबंद ठेवा अशा सूचना दिल्याने सोमवारी शहरातील एकाही प्रभागात  साफसफाई केली गेली नाही.त्यामुळे शहरात अस्वच्छता पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मक्तेदाराला नोटीस
शहरात साफसफाई न करता सोमवारी मक्तेदाराच्या कामगारांनी कामबंद केले. त्यामुळे मक्तेदाराला नोटीस बजावण्यात येणार असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ.विकास  पाटील यांनी सांगितले. सफाई मक्तेदाराला यापूर्वी देखील मक्ता रद्द का करण्यात येवू नये अशा आशयाची नोटीस बजावली होती. तसेच पदाधिकारी व नगरसेवक देखील  साफसफाईच्या कामावर समाधानी नाहीत. तसेच मक्ता रद्द करण्याची मागणी केली जात असतांनाही मनपा प्रशासन मक्ता रद्दची कारवाई का करीत नाही असा प्रश्‍न  उपस्थित होऊ लागला आहे.
मक्तेदाराकडील दोन लोडर मनपाच्या ताब्यात
मनपा प्रशासनाने मक्तेदाराला भाडेतत्वावर दोन लोडर दिले होते. ते सोमवारी मनपाच्या ताब्यात घेतले आहेत.दरम्यान, कामगारांनी अचानक कामबंद केल्याने प्रभाग क्रमांक  13 आणि 17 मधील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. त्यामुळे बांधकाम विभागातील तीन ट्रॅक्टरच्या माध्यमातून कचरा उचलण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिक ारी डॉ.विकास पाटील यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.