सण उत्सवात कोणीही अफवा पसरवु नये अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बछाव

0

चाळीसगाव,दि 17 –
चाळीसगाव शहर हे शांतताप्रिय शहर आहे आगामी काळात होळी हिंदु मुस्लीम बांधवांचा श्रद्धास्थान असलेले पिर मुसाकादरी उर्फ बामोशी बाबा यांचा उर्स व त्याच दिवशी शिव जयंती आहे हा दुध शर्करा योग चाळीसगावकरांसाठी आला आहे या दिवशी शिवजयंती सकाळी साजरी करुन सायंकाळी बाबांची तलवार निघेल त्या मिरवणुकीत सर्वांनी सहभागी व्हावे दर्गा ट्रस्टने भाविकांना सुविधा पुरवाव्यात, स्वंसेवकांची नेमणुक करावी, याकाळात खात्री झाल्याशिवाय अफवा पसरवु नये, सोशल मिडीयावर कोणाचिही भावना दुखावणार नाही अशा पोस्ट टाकु नये तसेच सण उत्सव सर्वांनी मिळुन साजरे करावे असे आवाहन अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बछाव यांनी दि 16 रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला सायंकाळी झालेल्या शांतता समितीच्या बैठकी प्रसंगी केले.

आगामी मुसाकादरी बाबा उर्स, होळी, शिवजयंती निमीत्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते

यावेळी डी वाय एस पी नजीर शेख यांनी शिवजयंती सकाळी साजरी करुन सायंकाळी तलवार मिरवणुकीत सहभागी व्हावे असे सांगुन पोलीस प्रशासन या काळात दक्ष असेल असे आश्वासन दिले.

यावेळी व्यासपिठावर प्रदिपदादा देशमुख, तदसिलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, पत्रकार किसनराव जोर्वेकर, स पो नि आशिष रोही, सुरेश शिरसाठ, पो उ नि मछिंद्र रणमाळे, राजेश घोळवे, युवराज रबडे, यांच्या सह शांतता समिती सदस्य, नगरसेवक व पत्रकार बांधव उपस्थित होते
सुत्रसंचलन उपनिरीक्षक राजेश घोळवे यांनी तर आभार निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांनी मानले
परिश्रम गोपनीय शाखेचे गणेश पाटील, पंढरीनाथ पवार यांनेर घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.