संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे स्वदेशी ‘तेजस’मधून उड्डाण !

0

बंगळूरु : शत्रूंना धूळ चारण्याची क्षमता असलेल्या स्वदेशी बनावटीच्या हलक्या ‘तेजस’ लढाऊ विमानातून आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उड्डाण केलं. कर्नाटकच्या बेंगळुरूमधील हिंदुस्थान एरोनोटिक्‍स लिमीटेडच्या विमानतळावरुन आज सकाळी उड्डाण केले. राजनाथ सिंह तेजस विमानात सुमारे अर्धा तास राहिले. तेजसमधून उड्डाण करणारे ते देशातील पहिले संरक्षण मंत्री आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

भारताचे तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (एलसीए) पाकिस्तान आणि चीनच्या लढाऊ विमानांपेक्षा वरचढ ठरत आहे. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात याआधीच तेजस लढाऊ विमानांचा समावेश करण्यात आला आहे. डीआरडीओच्या अॅरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीनं तेजसचे डिझाइन केले आहे. हिंदुस्तान अॅरोनॉटिकल लिमिटेडने (एचएएल) या लढाऊ विमानाची निर्मिती केली आहे. तेजस हे एक हलके लढाऊ विमान आहे, जे हिंदुस्तान एरोनॉटिक्‍स लिमिटेडने (एचएएल) तयार केले आहे. एचएएलला 83 तेजस विमानांव्दारे सुमारे 45 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. संरक्षणमंत्र्यांच्या तेजस विमानाचे उड्डाण हे त्यावेळी झाले आहे जेव्हा एचएएलकडून देशात 83 एलसीए मार्क 1ए विमानांच्या निर्मितीसाठी 45 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.