शॉर्टसर्कीटमुळे ऊस जळून खाक; पाच लाखांचे नुकसान

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव तालुक्यातील नशिराबाद शिवारात वीजेच्या तारांच्या शार्टसर्कीटमुळे आग लागून शेतातील ऊस जळून खाक झाल्याची घटना शनिवारी २५ डिसेंबर रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात रविवारी २६ डिसेंबर रोजी दुपारी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

रोहित प्रकाश पाटील (वय ४५, रा. श्रीकृष्ण नगर खाची अळी नशिराबाद ता.जि.जळगाव) हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे नशिराबाद शिवारातील शेत गट नंबर ६६८ मध्ये शेत आहे. त्यांच्या शेतात त्यांनी ऊसाची लागवड केली होती. शनिवार २५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेतातून गेलेल्या विद्यूत तारांच्या शॉर्टसर्कीटमुळे उसाला आग लागली.

यात सुमारे ५ लाख रूपये किंमतीचा उस व पीव्हीसी पाईप असा एकुण ५ लाख ३७ हजार रूपये किंमतीचा वस्तू जळून खाक झाले आहे. याप्रकरणी रोहित पाटील यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला.

रोहित पाटील यांच्या खबरीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात रविवारी २६ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता अकस्मात लागलेल्या आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र ठाकरे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.