शेरी येथे झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

0

धरणगाव । तालुक्यातील शेरी येथील एका तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहिदास वामन सोनवणे (वय-२५) असे या तरुणाचे नाव असून ही घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रोहिदास सोनवणे हा शेतातील कामे आणि हातमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रविवारी पहाटे गावातील एका शेतात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचा प्रकार आज सकाळी नागरीकांच्या लक्षात आला. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीसांच्या मदतीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्किय अधिकारी यांनी त्याला मयत घोषीत केले. याप्रकरणी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.