शेतकरी, महिला, आरोग्याला न्याय देणारा अर्थसंकल्प ; माजी आ.राणा दिलीपकुमार सानंदा

0

खामगांव:-   राज्यातील महाविकास आघाडी सरकारने 8 मार्च 2021 रोजी सादर केलेला अर्थसंकल्प हा षेतकरी, महिला आणि आरोग्य क्षेत्राला न्याय देणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात विदर्भाच्या वाटयाला 3 टक्के अधिक तरतूद केली आहे. अशी प्रतिक्रिया माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिली आहे.

बजेट बदद्ल प्रतिक्रिया देतांना सानंदा म्हणाले की, बजेटमध्ये शेतक-यांना 3 लाख रुपयापर्यंत पीककर्ज षून्य टक्के व्याजाने,कृशी पंप जोडणीसाठी 1500 कोटी, ‘पिकेल तेथे विकेल’ या योजनेसाठी 2100 कोटी रुपये आणि बाजार समितीसाठी 2 हजार कोटीची तरतूद, ईस्टर्न फ्री वेला माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख साहेबांचे नाव, ग्रामीण भागातील 10 हजार किलो मिटरच्या रस्ते कामांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महिला सक्षमीकरणाचा भाग म्हणून राजमाता जिजाउ, गृहस्वामीनी योजनेत घर खरेदी करणा-या महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात 1 टक्के सुट, विद्यार्थींनींना सुरक्षा व शिक्षणासाठी 12 वी पर्यंत मुक्त बससेवेची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. आरोग्य क्षेत्रातील विविध सुविधांसाठी 7500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर नगर पंचायती, नगर पालीकांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 7.5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कोरोना काळात षासनाच्या उत्पन्नाची साधने कमी झाली असतांना व 10 हजार कोटींची आर्थिक तूट असतांनाही राज्याच्या अर्थसंकल्पात महिला, महिला षिक्षण, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्यात आली. हा महाराश्टाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प असून यापुर्वीच्या शासनापेक्षा विदर्भासाठी 3 टक्के अधिक तरतूद केली आहे. त्यामुळे विदर्भालाही न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. त्याचप्रमाणे शेतकयांच्या थकित वीज बिलात 33 टक्के सुट देण्याचा महत्वपुर्ण निर्णयही महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ही या अर्थसंकल्पाची महत्वपूर्ण आणि जमेची बाजू असल्याचे सानंदा यांनी सांगितले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.