शिवसेनेचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर !

0

रत्नागिरी :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षांतर करत सत्ताधारी भाजप-शिवसेनेची वाट धरली. त्यामुळे विरोधक अगदीच बेजार झाले. मात्र, आता या पक्षांतराची झळ सत्ताधारी शिवसेनेलाही बसणार असल्याचं चित्र आहे. शिवसेनेचे दापोलीतील नेते आणि माजी आमदार सुर्यकांत दळवी भाजपच्या वाटेवर आहेत. दळवी भाजपमध्ये गेल्यास याचा मोठा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.

पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि सुर्यकांत दळवी यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने दळवींनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर दळवींच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दापोलीमध्ये सुर्यकांत दळवींचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे ते कुणाला मदत करणार यावर दापोलीतील विधानसभा निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल.

या भेटीबद्दल बोलताना सुर्यकांत दळवी म्हणाले, “मुख्यमंत्र्यांशी राजकीय चर्चा झाली. माझ्यावरील अन्याय मी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. मुख्यमंत्र्यांनी लवकरच मला बोलावून चर्चा करण्याचे आणि यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.”

Leave A Reply

Your email address will not be published.