शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ कोरोना पॉझिटीव्ह

0

धरणगाव (प्रतिनिधी) :-शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांचा कोरोना रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आला आहे. येथील आराधना हॉस्पिटलमध्ये ते उपचारार्थ दाखल झाले आहेत. दोन दिवसांपासून त्यांना त्रास होत होता. प्रकृतीस्थिर असून आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच कोरोना टेस्ट करून घेण्याचे आवाहन गुलाबराव वाघ यांनी केले आहे. सर्वांच्या सद्भावना आणि आर्शिवादाने आपण लवकरच पुन्हा सार्वजीनक जिवन आणि जनतेच्या सेवेत सक्रीय होईल असा विश्‍वास गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोना विरूध्दच्या लढ्यात गुलाबराव वाघ यांनी मोठे योगदान दिले आहे. संपूर्ण जिल्ह्यात त्यांचा सातत्याने संपर्क सुरू होता. गेल्या वर्षभरात तर त्यांनी प्रत्यक्ष रूग्णसेवेला प्राधान्य दिले होते. त्यांच्या पत्नी, माजी नगराध्यक्षा सौ.उषाताई वाघ, आई आणि मुलगा सुध्दा गेल्या वर्षी पॉझिटीव्ह आले होते. मात्र, न डगमगता गुलाबराव वाघ यांचा जनसंपर्क सुरूच होता. पालिकेच्या कामकाजासह जिल्ह्यातील शिवसैनिकांची त्यांनी या काळात प्रचंड काळजी घेतली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून त्यांना त्रास जाणवत होता. खबरदारी म्हणून त्यांनी आज आपला स्वॅब दिला आणि रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता येथील आराधना हॉस्पिटलमध्ये स्वत:ला उपचारार्थ दाखल करून घेतले आहे.

घाबरण्याचे कारण नाही. मात्र, सर्वांनीच काळजी घेण्याचा सल्ला गुलाबराव वाघ यांनी दिला आहे. दरम्यान, उपचार करणारे डॉ.सुयश पाटील आणि डॉ.धिरज पाटील यांनी गुलाबराव वाघ यांची प्रकृतीस्थिर असल्याचे स्पष्ट केले आहे. गुलाबरावांना कोणतेही गंभीर लक्षणे नाहीत. मात्र, 14 दिवस त्यांना विलगीकरण कक्षातच रहावे लागणार आहे. शिवसैनिक आणि भाऊंवर प्रेम करणाऱ्यांनी त्यांना भेटण्याचे टाळावे. दुरध्वनीवरूनही संपर्क साधू नये. औषधोपचारांसह सक्तीचा आराम त्यांच्यासाठी महत्वाचा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.