शिवसेना माझ्या सोबतच हे रक्षा खडसे यांचे वक्तव्य चुकीचे…

0

कोणत्याही शिवसैनिकांचा संपर्क नाही : तालुका प्रमुख समाधान महाजन
भुसावळ | प्रतिनिधी
चोपड्यापासून तर थेट नांदुऱ्यापर्यंत सर्व शिवसैनिक माझ्या सोबत आहेत. केवळ एक दोन कार्यकर्त्यांचाच विरोध आहे. ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे मत रावेर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांनी व्यक्त केले होते. हे (सपशेल ) पूर्णतः चुकीचे असून त्या दिशाभूल करीत आहेत, उलट एक दोनच शिवसैनिक त्यांच्या संपर्कात असून आधीपासूनच त्यांना बंडखोरीचे लेबल लागले आहे असे भुसावळ तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी कळवले आहे.
रावेर मतदार संघातून भाजपतर्फे खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करून आम्ही रावेर मतदार संघात भाजपचे काम करणार नाही, असा ईशारा दिला आहे. शिवसेना भाजपची युती झाली आहे हे मान्य असून पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील सह चोपड्या पासून तर थेट नांदुऱ्यापर्यंतचे सर्व तालुका प्रमुख, तालुका संघटक, विधानसभा क्षेत्रप्रमुख इतर पदाधिकारी व सर्व शिवसैनिक घेणार आहेत.
         उर्वरित उद्याच्या अंकात…

Leave A Reply

Your email address will not be published.