शिवजयंती उत्सवाची सुरुवात मोटारसायकल रॅलीने

0
जळगांव. दि.19-
शहरातून यंदा प्रथमच 10 दिवसीय सर्वसमावेशक सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेत साजरा करण्यात येत आहे. या शिवजयंती उत्सवाची सुरुवात मोटारसायकल रॅलीने करण्यात आली. या मोटारसायकल रॅलीत सुमारे 500 मोटारसायकल स्वार सहभागी झाले होते. हातात भगवे झेंडे घेऊन शिस्तबद्धपणे ही मोटारसायकल रॅली शहरातील विविध मार्गांतून काढण्यात आली. रॅली काव्यरत्नावली चौकापासून निघून ती पुढे नेहरू चौक, जुने जळगाव, शनिपेठ, बळीरामपेठ व शेवटी जीएस ग्राउंड येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ मोटारसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.