शिक्षकांनी व्यक्त केलेली कृतज्ञता हिच कामाची खरी पावती

0

 – शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे साहेब

भुसावळला आभार समारंभ : सव्वा तीन वर्षांच्या कार्याचा शिक्षकांनी केला गौरव

भुसावळ (प्रतिनिधी ) –गेल्या सव्वा तीन वर्षांच्या कालावधीत भुसावळ शहर व तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना वेळोवेळी मार्गदर्शन करत गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले. स्वतःची जबाबदारी अगदी चोख व पूर्णपणे सांभाळून शिक्षकांच्या सुखदुःखात सहभागी झालो. त्यामुळे भुसावळ येथून जाताना शिक्षकांनी व्यक्त केलेली कृतज्ञता हिच माझ्या कामाची खरी पावती ठरली असल्याचे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे साहेब यांनी येथे केले.
भुसावळ येथील द. शि. विद्यालयात आयोजित आभार समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. पी. भिरूड तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी तुषार प्रधान, जी. आर. चौधरी, आर. आर. धनगर, प्रदीप साखरे, एस. एस. अहिरे, समाधान जाधव, गणेश लोखंडे, डॉ. अनिल पाटील, सुनील वानखेडे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविकात मुख्याध्यापक जे. पी. सपकाळे यांनी कार्यक्रम आयोजनाचा हेतू सांगून श्री. अहिरे साहेब यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाचा गौरव केला. त्यानंतर आभार मानपत्राचे वाचन वाय. आर. पाटील यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आभार मानपत्र देऊन श्री. अहिरे साहेब यांना देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर तबस्सुम निगार, समाधान जाधव, तुषार प्रधान, जी. आर. चौधरी, आर. आर. धनगर, दीपक पाटील महाराज, केंद्रप्रमुख अशपाक सर, प्रदीप सोनवणे, प्रदीप साखरे, डॉ. अनिल पाटील, रामलाल परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे साहेब यांनी आपल्या सव्वा तीन वर्षांच्या कालखंडात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांमध्ये साधलेला समन्वय, गुणवत्तावाढीसाठी केलेले विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण कार्यक्रम तसेच उत्तर महाराष्ट्रातील एकमेव शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालवलेले रीड ग्रंथालय यासह विविधांगी कार्यक्रमांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांमध्ये ऊर्जा निर्माण केली. भुसावळ येथील गटसाधन केंद्र अद्ययावत केले. शिक्षणक्षेत्रातील नवनवीन बदल आणि त्यानुसार अध्ययन-अध्यापन व मूल्यमापनामध्ये करावयाचे बदल याबाबतही त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केले. त्यामुळे भुसावळ शहर व तालुक्यातील सर्व शिक्षकांना एकत्रित येऊन आयोजित केलेला हा कृतज्ञता समारंभ यशस्वी ठरले असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात एस. पी. भिरूड म्हणाले की, सुमित्र अहिरे साहेब यांनी फक्त अधिकारी न राहता शिक्षकांविषयी आपुलकी ठेवून त्यांच्यात समन्वय साधण्याचे काम केले व सतत दिशा देऊन यशस्वी वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन दिले. यानंतर उपस्थित भुसावळ शहर व तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागात कार्यरत सुमारे दोनशेच्यावर मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी श्री. अहिरे साहेब यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करून त्यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सूत्रसंचालन संजू भटकर यांनी तर आभार एस. एस. अहिरे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.