शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या जमावाचे काय?

0

पोलिसांना यावलकारांचा प्रश्न

यावल :- दि.५ रोजी सायंकाळी ६ वाजता यावल पोलीस स्टेशन आवारात एका महिलेने महिला पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर यांच्या अंगावर धावत जावून आरडा-ओरड करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला ही कौतुकास्पद बाब आहे. परंतु शहरात कुठेही केव्हाही किरकोळ भांडण सुद्धा झाले असता पोलीस स्टेशन आवारात ओ आवाराबाहेर फार मोठा जनसमुदाय जमा होऊन गोंधळ घालतात त्या जमावाविरुद्ध यावल पो.नि.दत्तात्रय परदेशी व पुरुष असलेले पोलीस उपनिरीक्षक पोलीस कार्यवाही का करीत नाही? असा प्रश्न यावलकरांकडून पोलिसांना विचारला जात आहे.

गेल्या ५ ते १० वर्षापासून यावल पो.स्टे. कार्यक्षेत्रात कोणतीही अप्रिय घटना घडो, अपघात, भांडण तंटे, दोन गटात हाणामारी, प्रेम प्रकरणे, चोरी, दरोडे इत्यादी गंभीर प्रकरणे घडले असता फिर्यादी, आरोपीसोबत यावल पो.स्टे. आवारात मोठा जनसमुदाय जमा होऊन गोंधळ घालत असतात. ही सर्व घटना पोलिसांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पुराव्यानिशी बंदीत होत असते आणि यावल पोस जमावाचा तमाशा नियंत्रण करण्यात व्यस्त होत असतात. परंतु दि.५ रोजी साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इयत्ता १० वी परीक्षा केंद्राबाहेर दोन गटात जोरदार हाणामारी झाल्याने पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर यांनी संशयितास यावल पो.स्टे.ला पकडून आणल्याने यावल पो.स्टे.ला एका गटाचा मोठा जनसमुदाय जमला होता. यासह एक संशयित मुलाच्या आईने पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर यांच्या समोर आरडा-ओरड करून शासकीय कामात अडथळा आणला. पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर यांनी समयसूचकता, कर्तव्यपालन करीत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्या महिला आरोपीस दि.६ रोजी यावल न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दि.२० मार्चपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे मोठी खळबळ उडाली.

एका बाजूला एका महिलेविरुद्ध कारवाई तर मोठा जमाव करून यावल पोलिसाच्या शासकीय कामकाजात अडथळा आणणाऱ्या जमावाविरुद्ध कार्यवाही का नाही? असा प्रश्न संपूर्ण यावल शहरात उपस्थित केला जात आहे. गुन्हा दाखल करण्याचे काम-काज सुरु असताना गुन्हा दाखल होतो किंवा नाही यासाठी पो.नि.परदेशी यांच्या कॅबीनला ६ ते १० जनाचा समुदाय ठाण मांडून का असतो? पोलीस प्रशासनावर तथा कार्यवाहीवर विस्वास नाही का? ठाण मांडून बसने म्हणजे शासकीय कामात अडथळा नव्हे का? इत्यादी अनेक प्रश्न यावलकरांमध्ये उपस्थित होत असून शहरात जातीय सलोखा, कायदा सुव्यवस्था राखनेकामी पोलिसांनी ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.