शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रक्तदान शिबीर

0

भुसावळ :-  येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे राष्ट्रीय सेवा योजना व गोदावरी मेडिकल कॉलेज साकेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीर मंगळवार दि ४ रोजी सकाळी १० वाजता संपन्न झाले .प्रसंगी शिबिरात सर्व प्रशिक्षणार्थींचे रक्तगट तपासणी करन्यात  आली यामध्ये ३६ प्रशिक्षणार्थी व १८ प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीनी सहभाग घेतला . यावेळी संस्था प्रमुख ए आर राजपूत . एम पी सूर्यवंशी , आर एन चौधरी , योगेश भोळे, दर्शन पाटील. मनीष लोखंडे, यांनी स्वच्छेने रक्तदान केले . प्रसंगी रक्तदान श्रेष्ठदान यांचे महत्व सांगितले तसेच गोदावरी मेडिकल कॉलेज तर्फे संस्थेचे प्राचार्य ए आर राजपूत व कर्मचारी यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

रक्त संकलन करणे करिता गोदावरी मेडिकल कॉलेज डॉ नितीन भारंबे , डॉ रितेश वारके, व इतर सहकारी उपस्थित होते . रक्तदान शिबिरात प्रशिक्षणार्थी व निदेशक कडून ५४ बाटली रक्त संकलन करण्यात आले या सर्वांचे संस्थेतर्फे अभिनंदन करण्यात आले. शिबीर यशस्वितेकरिता एम एस महाजन , एम पी सूर्यवंशी , आर एन चौधरी  , एस एन गुरचळ , डी एस चव्हाण , एन एस तडवी , एम वाय तडवी , डी के गुजरकर, योगेश भोळे, नेमाडे सर, यांनी परिश्रम घेतले. तसेच गोदावरी मेडिकल कॉलेज तर्फे संस्थेचे प्राचार्य ए आर राजपूत व कर्मचारी यांना स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला .

Leave A Reply

Your email address will not be published.