शरद पवारांच्या ताफ्यातील वाहनाची बाईकस्वाराला धडक

0

नागपूर :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ताफ्यातील एका वाहनाने ( बोलेरो जीप ) बाईकस्वाराला जोरदार धडक दिल्याची घटना आज घडली.नागपूर जिल्ह्यातील भारसिंगीवरून खापाकडे जाताना जामगावजवळ ही घटना घडली असून यात बाईकस्वार तरुण जखमी झाला आहे .

शरद पवार हे परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भागाचा दौरा करत आहेत. शरद पवार आज विदर्भातील नागपुरात आहे. या दौऱ्यात शरद पवार पवारांच्या ताफा भारसिंगीवरुन खापाकडे निघाला होता. त्यावेळी पुढच्या गाडीची तरुणाच्या दुचाकीला धडक बसली. हा अपघात झाला त्यावेळी शरद पवारांची गाडी मागे होती. दरम्यान, अपघातात दुचाकीस्वार तरुण किरकोळ जखमी झाला असून त्याला जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवलं.

Leave A Reply

Your email address will not be published.