व्यापाऱ्यांकडून होणाऱ्या पिळवणूकीच्या विरोधात शेतकऱ्यांचे लाक्षणिक उपोषण..

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे शेतकरी बांधव आर्थिक संकटात असून जळगाव तालुक्यासह जिल्हाभरातही केळी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे केळी पिकाचा भाव जिल्हा केळी उत्पादक यांचा बोर्ड भावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. केळीला योग्य भाव मिळावा  अशा विविध मागण्यांसाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण साकारला आहे.

थेट लाईव्ह…..👇

राज्यात झालेल्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे केळी बोर्ड भावानुसार योग्य ते फरकासहित केळी खरेदी करण्यात यावी, केळी उत्पादक शेतकरी बांधवांची व्यापारी वर्गाकडून होणारी पिळवणूक थांबवावी, केळी व्यापारी हा परवानाधारकच असला पाहिजे, तसेच बाजार समितीने त्यांचे नाव व मोबाईल क्रमांक प्रकाशित करावे, अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करावा व पंचनामे न करता सरसकट 50 हजार रुपये हेक्टरी अनुदान द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.

यावेळी भाऊसाहेब सोनवणे, छोटू सरकार, चंद्रभान पवार, संजय बडगुजर, अशोक पाटील, राजेंद्र पवार या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यापारांचा मनमानी कारभार व बाजार समितीच्या नाकर्तेपणाच्या विरोधात घोषणा देत एकाधिकारशाही व्यापारी वर्गाविरुद्ध लाक्षणिक उपोषण स्वीकारला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.