व्याख्याते संतोष पाटील राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

0

पाचोरा – सुप्रसिद्ध व्याख्याते, लेखक, समाज सेवक संतोष पाटील गोराडखेडेकर यांना नाना शंकर शेठ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाटील हे सर्व महामानवांचे विचारांचे विचार ग्रामीण भागात, वाड्या, वस्तीवर जाऊन सांगत असतात. व्याख्यानांचे मानधन ते वुद्धाआश्रम व अनाथालयात देत असतात. ‍त्याच बरोबर त्यांनी आजपर्यंत चाळीस लोकांचा अंत्यविधी केलेला आहे .

त्यांच्या या सामाजिक कार्यांसाठी त्यांना नाना शंकर शेठ राष्ट्रीय स्मृति  पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  भारतातून ३१ समाज सेवकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याआधी पाटील यांना दोन राष्ट्रीय व आठ राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. दि. १० फेब्रुवारी सोमवार या रोजी जळगाव येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यसभागृह येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नाना शंकर शेठ यांचे पणतू सुरेंद्र शंकर शेठ हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ना. गुलाबराव पाटील , आ. सुरेश भोळे, आ. चंदुलाल पटेल, आ. अनिल पाटील, मा. विधान सभा अध्यक्ष अरुण गुजराथी, महापौर चंद्रकांत सोनार (धुळे) , जि. प . सदस्य पाटील, नगरसेविका रेखा वानखेडे (सावदा), नगरसेवक सुरेश सोनवने, रंजना वानखेडे, शांमकांत दाभाडे हे उपस्थित होते. शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.