विवाहितेचा विनयभंग; तरुणावर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भाजीपाला विक्री करणाऱ्या ३६ वर्षीय विवाहितेला अश्लिल शिवीगाळ करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तरूणावर रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका भाजीपाला विक्री करणाऱ्या 36 वर्षीय महिला आपल्या पती व मुलांसह वास्तव्याला आहे. भाजीपाला विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. त्याच भागात राहणारा संशयित आरोपी दिनेश रवींद्र बारी (वय २५) हा विवाहितेला गेल्या एक वर्षांपासून पाठलाग करत आहे.

तसेच विवाहितेला फोनवर अश्लील शिवीगाळ करून पती व मुलांना सोडून माझ्याकडे राहा असे बोलून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार सोमवार ३ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता घडला. याप्रकरणी विवाहितेने रामानंदनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी ४ जानेवारी रोजी रात्री धाव घेऊन रिक्षाचालकाविरोधात तक्रार दिली.

दरम्यान विवाहितेच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात संशयित आरोपी दिनेश रवींद्र बारी याच्याविरोधात रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी  पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश पाटील करीत आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.